35.1 C
New Delhi
Monday, May 25, 2026
HomeTop Five Newsश्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव

पुणे : प्रतिनिधी
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी बाप्पाला ७ हजार आंब्यांची आकर्षक आरास करुन महानैवेद्य दाखविण्यात आला. तसेच यानिमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने सकाळची आरती बी. यू. भंडारी ग्रूपचे चंद्रवर्धन भंडारी व उल्हास घाटगे यांनी सपत्नीक तसेच चिवडेवाले रामचंद्र भगवानदास यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनीही आरतीत सहभागी होत मंगलमय वातावरणाचा अनुभव घेतला.

आंबा महोत्सवासाठी यंदा तब्बल ७ हजार आंब्यांचा वापर करून बाप्पांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवलेले गणरायाचे रूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरत असून, दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या सजावटीसाठीचे आंबे शहरातील विविध अनाथ आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत.

दरम्यान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, पुणेकर भक्तांमध्ये या सोहळ्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
——-.


‘‘हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पावर पुणेकरांसह संपूर्ण राज्यातील भाविकांची विशेष श्रद्धा आहे. आज अक्षय तृतियेनिमित्त बाप्पाला ७ हजार आंब्यांचा आरासरुपी दाखवलेला केवळ महानैवेद्य नसून मानवतेचीही पूजा आहे. कारण हे सर्व आंबे शहरातील विविध आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत. बाप्पाचा भाविक म्हणून आमच्या सर्वांसाठीच हे अत्यंत पवित्र कार्य असून आमच्या हातून ते असंच वाढत जावो, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना’’.
पुनीत बालन
(उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
35.1 ° C
35.1 °
35.1 °
24 %
4.1kmh
20 %
Mon
45 °
Tue
46 °
Wed
46 °
Thu
47 °
Fri
40 °

Most Popular

Recent Comments