35.3 C
New Delhi
Monday, July 13, 2026
HomeTop Five Newsपिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर

प्रभाग २८ मधून प्रचाराचा जोरदार प्रारंभ

पिंपरी-चिंचवड : महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरातील सर्वात पहिला पॅनल जाहीर करत निवडणूक प्रचाराचा शुभारं केला. २१ डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणी येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली.

या पॅनलमध्ये
१) सर्वसाधारण पुरुष – श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे,
२) सर्वसाधारण ओबीसी – सौ. मिनाक्षी अनिल काटे,
३) सर्वसाधारण महिला – सौ. शीतलताई नाना काटे,
४) सर्वसाधारण महिला – सौ. सायली उमेश काटे
यांचा समावेश आहे.

या प्रचाराचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रचारप्रमुख व माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या हस्ते करण्यात आला. अखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, तसेच पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुजोबां महाराज यांच्या मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचाराची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यानंतर पिंपळे सौदागर गावठाण परिसरातून पदयात्रेला प्रारंभ करत संपूर्ण परिसरात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या फेरीत ग्रामस्थ, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रचारफेरीदरम्यान पॅनलमधील उमेदवारांचे नागरिकांच्या वतीने जागोजागी औक्षण करून स्वागत करण्यात आले. या फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना संबोधित करताना विठ्ठल उर्फ नाना काटे म्हणाले की, “शहरातील सर्व प्रभागांमध्ये ५० टक्के आरक्षणानुसार दोन महिला व दोन पुरुष उमेदवारांचा पॅनल आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर-रहाटणी असा आहे, जिथे ३ महिला आणि १ पुरुष असा पॅनल उभा करण्यात आला आहे. हा प्रभाग शहरासाठी आदर्श ठरेल.”

“या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलला संपूर्ण शहरातील सर्वाधिक, भरघोस मतांनी निवडून देऊन जनतेने विश्वास व्यक्त करावा,” असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहिलाच पॅनल जाहीर करून प्रचाराला सुरुवात केल्यामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीची विशेष चर्चा सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.3 ° C
35.3 °
35.3 °
37 %
5.1kmh
64 %
Mon
42 °
Tue
42 °
Wed
42 °
Thu
42 °
Fri
38 °

Most Popular

Recent Comments