39.6 C
New Delhi
Saturday, July 11, 2026
HomeTop Five Newsऑनलाईन ‘एनओसी’ प्रणाली प्रथमच लागू; उमेदवारांसाठी दिलासा

ऑनलाईन ‘एनओसी’ प्रणाली प्रथमच लागू; उमेदवारांसाठी दिलासा

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर २०२५ असून, अर्जासोबत आवश्यक असणारे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) मिळवण्यासाठी पुणे महापालिकेने प्रथमच ऑनलाईन प्रणाली अंमलात आणली आहे.

मागील निवडणुकांमध्ये एनओसी देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणे तसेच प्रमाणपत्र देण्यात होणारा विलंब लक्षात घेता, यावेळी ही ऑनलाईन यंत्रणा सुरू करण्यात आली आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२०२६ साठी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी नागरिकांसाठी
https://nocelection.pmc.gov.in ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या ऑनलाईन प्रणालीद्वारे पुणे महापालिकेच्या एकूण ४१ खात्यांना जोडण्यात आले असून, उमेदवाराचा अर्ज एकाच वेळी सर्व खात्यांकडे एनओसीसाठी पाठवला जाणार आहे. त्यामुळे प्रक्रिया अधिक जलद व पारदर्शक होण्याची अपेक्षा आहे.

सदर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची लिंक ३० डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उपलब्ध राहणार आहे. २९ डिसेंबर २०२५ पर्यंत सादर होणाऱ्या अर्जांची प्राधान्याने पूर्तता करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाणार आहे. मात्र, ३० डिसेंबर रोजी प्राप्त होणारे अर्ज विलंबाने आल्यास संबंधित खात्यांकडून वेळेत एनओसी न मिळाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदाराची राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

या नव्या ऑनलाईन प्रणालीमुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार असून, निवडणूक प्रक्रियेत अधिक सुलभता येणार असल्याचे चित्र आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
39.6 ° C
39.6 °
39.6 °
28 %
4.6kmh
76 %
Sat
39 °
Sun
42 °
Mon
42 °
Tue
41 °
Wed
41 °

Most Popular

Recent Comments