पुणे- पुणे महापालिकेची निवडणूक ४१ प्रभागांतील १६५ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होती. तर या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. अशातच पुण्याच्या सिंहगड रोड भागातून एका महिला नगरसेविकेची बिनविरोध निवड झाली आहे.
प्रभाग क्रमांक 35 सनसिटी माणिक बाग येथून भाजपच्या उमेदवार मंजुषा नागपुरे या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. सलग तिसऱ्यांदा त्या निवडणूक लढवत होत्या. तर प्रभाग ३५ ड सर्व साधारण या गटातून भाजपचे श्रीकांत शशिकांत जगताप या बिनविरोध विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधातील नितीन गायकवाड यांनी अर्ज माघारी घेतला.


