34.1 C
New Delhi
Thursday, May 28, 2026
HomeTop Five Newsआरटीओत विक्रमी वाहन नोंदणी

आरटीओत विक्रमी वाहन नोंदणी

१२१९ कोटींचा महसूल

पिंपरी: पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) २०२५ या वर्षात विक्रमी २ लाख १८ हजार २८२ वाहनांची नोंदणी झाली असून, यातून १,२१९ कोटी १४ लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीतही लक्षणीय वाढ झाली असून, शहरातील एकूण वाहनसंख्या आता २५ लाख १६ हजारांवर पोहोचली आहे.

गेल्या पाच वर्षांत पिंपरी-चिंचवड आरटीओकडे वाहन नोंदणीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र आहे. वाहन नोंदणी, फॅन्सी नंबर, पर्यावरण कर तसेच विविध परवान्यांमधून आरटीओला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो.
२०२२ मध्ये ८२२ कोटी २० लाख ६३ हजार रुपये,
२०२३ मध्ये ९७८ कोटी १९ लाख ८८ हजार रुपये,
२०२४ मध्ये १,०९५ कोटी ४७ लाख ५४ हजार रुपये,
तर २०२५ मध्ये १,२१९ कोटी १४ लाख ४३ हजार ७१७ रुपये महसूल जमा झाला आहे.

२०२५ मध्ये नोंदणीकृत वाहनांमध्ये १ लाख ३३ हजार ११७ दुचाकी५२ हजार ३९८ मोटारी आणि ६ हजार ९१२ ऑटो रिक्षांचा समावेश आहे. याशिवाय नोंदणी झालेल्या २९ हजार ४३७ वाहतूक वाहनांमध्ये १० हजार ९०४ मालवाहतूक वाहनांचा समावेश आहे.

वाहनसंख्येतील ही वाढ शहरातील वाहतूक व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांसमोर नवी आव्हाने उभी करत असली, तरी आरटीओच्या महसुलात झालेली वाढ राज्याच्या उत्पन्नासाठी महत्त्वाची ठरत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
34.1 ° C
34.1 °
34.1 °
29 %
2.6kmh
0 %
Thu
45 °
Fri
44 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments