41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
HomeTop Five Newsस्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

स्वीकृत नगरसेवकपदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

 एनओसीसाठी १९३ अर्ज

POLITICAL NEWS | पुणे- महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या दहा जागांसाठी राजकीय पक्षांतर्गत हालचालींना वेग आला असून इच्छुकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) मिळवण्यासाठी आतापर्यंत तब्बल १९३ जणांनी अर्ज सादर केले आहेत. प्रशासनाने त्यापैकी सुमारे १६३ जणांना एनओसी प्रदान केली आहे. त्यामुळे स्वीकृत सदस्यपदासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे.

महापालिकेत एकूण १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये सर्वाधिक ७ सदस्य भाजपचे, २ राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि १ काँग्रेसचा सदस्य असणार आहे. महापालिका निवडणुकांनंतर या महिन्यात महापौर, स्थायी समिती तसेच विविध विशेष समित्यांच्या सदस्यांची नियुक्ती पूर्ण झाली असून, आता स्वीकृत सदस्य नेमण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

महापालिका आयुक्तांकडून ही प्रक्रिया संबंधित राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चा करून राबवली जाणार आहे. महापौर निवडीनंतर लगतच्या महिन्यातील मुख्यसभेत स्वीकृत सदस्यांची नियुक्ती केली जाणार असल्याने मार्च २०२६ मधील मुख्यसभेत अंतिम निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी इच्छुकांकडून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे.

स्वीकृत सदस्यांसाठी निवडून आलेल्या सदस्यांप्रमाणेच महापालिकेची कोणतीही देणी नसल्याचे प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली असून, त्या माध्यमातून आतापर्यंत १६९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

महापालिकेत ११९ सदस्य निवडून आल्यामुळे नियमानुसार भाजपला सर्वाधिक सात स्वीकृत नगरसेवकपदे मिळणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने तब्बल ५२ इच्छुकांची यादी राज्याच्या कोअर कमिटीकडे पाठविल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, माजी नगरसेवक तसेच निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांना संधी दिली जाणार नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. त्यामुळे स्थायी समितीच्या निवडीप्रमाणेच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीतही भाजपकडून धक्कातंत्र वापरले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी पुढे येत आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदाच्या नियुक्तीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, आगामी मुख्यसभेत कोणाला संधी मिळते याची उत्सुकता वाढली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments