35.1 C
New Delhi
Saturday, May 9, 2026
HomeTop Five Newsखेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय

२१ पैकी २१ जागांवर एकहाती सत्ता

पुणे : खेड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक आणि एकतर्फी विजय मिळवत २१ पैकी २१ जागांवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गृहराज्य मंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने २१–० असा क्लीन स्वीप करत नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवली.

२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर खेडमध्ये सत्तासमीकरण कसे राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र निकाल जाहीर होताच महायुतीने सर्व जागांवर विजय मिळवत विरोधकांना पूर्णपणे नामोहरम केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीला एकही जागा जिंकता आली नाही.

या घवघवीत विजयानंतर माधवी भुटाला या नगराध्यक्षा पदावर विराजमान होणार आहेत. जनतेने दिलेल्या स्पष्ट कौलातून विकासाभिमुख नेतृत्वावरचा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे १७ उमेदवार तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले. २१–० असा निकाल खेडच्या राजकारणात मैलाचा दगड ठरणारा असून, महायुतीच्या एकसंध आणि प्रभावी नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास व्यक्त झाल्याचे मानले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
35.1 ° C
35.1 °
35.1 °
31 %
2.1kmh
20 %
Sat
35 °
Sun
41 °
Mon
44 °
Tue
44 °
Wed
45 °

Most Popular

Recent Comments