32.2 C
New Delhi
Sunday, July 26, 2026
Homeताज्या बातम्यापुणे महिला मंडळातर्फे कर्तृत्ववान महिलांना ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार’

पुणे महिला मंडळातर्फे कर्तृत्ववान महिलांना ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार’

पुणे : ‘डिजिटल अरेस्ट’ अशी कायद्यात तरतूद नाही. ज्येष्ठ नागरिकांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून त्यांची कोट्यवधी रूपयांची लुबाडणूक केली जात आहे. समाजमाध्यमांद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जनजागृहीत हाच पर्याय आहे, असे मत सायबर सुरक्षा विभागातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे-बोराडे यांनी व्यक्त केले.
आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजात वेगळा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त पुणे महिला मंडळातर्फे बुधवारी (दि. ११) ‘नारी शक्ती सन्मान पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. त्या वेळी स्वप्नाली शिंदे-बोराडे यांनी उपस्थितांशी संवाद साधला. पुरस्कारांचे वितरण पुणे महिला मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. सचिव उल्का शहा, सहसचिव स्मिता इनामदार, सहाय्यक सचिव वैशाली देशपांडे, खजिनदार मिनाक्षी आपटे मंचावर होत्या. पर्वती पाथया येथील संस्थेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


एनसीएलमधील मुख्य शास्त्रज्ञ डॉ. ज्योती जोग, औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञ प्राची ममदापूर, आदिवासींसाठी सेवाकार्य करणाऱ्या सुनीता गोडबोले, देव-देवतांच्या मूर्तींवर वज्रलेप करणाऱ्या स्वाती ओतारी, आकाशवाणी कलाकार माधवी पानसरे, भरतकामाचा ७५ वर्षांचा वारसा जपणाऱ्या ललिता परांजपे, कथक नृत्यांगना माधुरी आपटे, चतुरस्र व्यक्तिमत्व असलेल्या संजीवनी औटी, लेखिका, कवयित्री वंदना धर्माधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे-बोराडे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रास्ताविकात मंडळाच्या अध्यक्षा केतकी कुलकर्णी यांनी संस्थेच्या ९९ वर्षांच्या वाटचालीचा आढावा विशद केला. संस्थेचे कार्य पाहून पुणे महिला मंडळाचा प्रथितयश सामाजिक संस्था असा उल्लेख केला जातो. भविष्यातही संस्थेची वाटचाल अशाच पद्धतीने करायची आहे.
समाजमाध्यमांचा वापर करताना स्वयंशिस्त आवश्यक असल्याचे सांगून स्वप्नाली शिंदे-बोराडे म्हणाल्या, गुन्हा टाळण्यासाठी थांबा, विचार करा आणि त्यानंतर कृती करा या त्रिसूत्रीचा अवलंब करणे आवश्यक आहे.
पुरस्कारप्राप्त महिलांनी आपआपल्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले. सत्कारार्थींचा परिचय स्मिता इनामदार, वैशाली देशपांडे, मिनाक्षी आपटे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उल्का शहा यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.2 ° C
32.2 °
32.2 °
56 %
4.4kmh
100 %
Sun
37 °
Mon
39 °
Tue
37 °
Wed
33 °
Thu
31 °

Most Popular

Recent Comments