32.1 C
New Delhi
Sunday, August 2, 2026
Homeमहाराष्ट्रभटक्या श्वानांच्या रेबीज लसीकरण मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

भटक्या श्वानांच्या रेबीज लसीकरण मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे

पिंपरी,- : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने ‘पीसीएमसी श्वान रेबीज प्रतिबंधक लसीकरण, जनजागृती व सर्वेक्षण’ करण्यासाठी मिशन रेबीज मोहिम हाती घेण्यात आली असून यासाठी डब्ल्यूव्हीएस ही संस्था कार्यरत आहे. संबंधित संस्थेचे कर्मचारी आपल्या परिसरातील भटक्या श्वानांचे रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी आल्यानंतर त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन पशुवैद्यकीय विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मिशन रेबीज अंतर्गत प्राणीप्रेमी व नागरिक यांच्यासोबत समन्वय साधत शहरातील भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यात येत आहे. हे काम सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत शहरातील विविध भागांमध्ये सुरू असते. या कामासाठी नियुक्त संस्थेच्या वतीने आतापर्यंत ९ हजार ३९९ भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण केले आहे. परंतु काही ठिकाणी श्वानांचे रेबीज लसीकरण करताना संबंधित संस्थेच्या कर्मचाऱ्यांना अडथळा निर्माण केला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. असा अडथळा निर्माण करणाऱ्या नागरिकांवर नियमान्वये कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
…..

शहरात रेबीजचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भटक्या श्वानांचे रेबीज लसीकरण ही अत्यंत महत्त्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना आहे. मिशन रेबीज च्या माध्यमातून ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत असून नागरिकांनी संबंधित कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे. काही ठिकाणी अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा प्रकारे अडथळा निर्माण करणाऱ्यांवर नियमान्वये कारवाई करण्यात येईल.
— संदीप खोत, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
32.1 ° C
32.1 °
32.1 °
59 %
3.6kmh
93 %
Sun
36 °
Mon
37 °
Tue
36 °
Wed
36 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments