38.4 C
New Delhi
Friday, June 12, 2026
Homeआरोग्यभरतभाई शाह (सुयोग ग्रुप) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

भरतभाई शाह (सुयोग ग्रुप) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

Blood camp | पुणे: शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्ट आणि जिनेंद्र सोशल फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. भरतभाई के. शाह (सुयोग ग्रुप) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मानवसेवेची भावना जपणाऱ्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी रक्तदानाबरोबरच नागरिकांसाठी मोफत श्रवण चाचणी डॉ.आर्णिक शहा यांच्या तर्फे आयोजित करण्यात आली होती. तसेच हृदयविकाराच्या झटक्याची सत्यस्थिती आणि त्यापासून बचावाचे उपाय या विषयावर डॉ . हसमुख गुजर यांचे विशेष आरोग्य मार्गदर्शन व्याख्यान झाले.

गुरुवार, १२ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत शुक्रवार पेठ येथील जयराज भवन, शेठ बेचरदास मानचंद जैन ट्रस्ट या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला.

ट्रस्ट उपाध्यक्ष दिलीप मेहता, सेक्रेटरी सुनील र.शहा तसेच राम बांगड, अनिल शहा, सुनील शहा, कल्पेश शहा, निलेश शहा, नरेंद्र शहा आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरात ६० व्यक्तींनी रक्तदान केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
38.4 ° C
38.4 °
38.4 °
28 %
3.8kmh
37 %
Fri
38 °
Sat
42 °
Sun
43 °
Mon
43 °
Tue
42 °

Most Popular

Recent Comments