34.6 C
New Delhi
Thursday, June 4, 2026
HomeTop Five Newsअक्षय्यतृतीयेला 'दगडूशेठ’ गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महाभोग

अक्षय्यतृतीयेला ‘दगडूशेठ’ गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महाभोग

पुणे : अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महाभोग दाखविण्यात आला. साडेतीन मुहूतार्पैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्यतृतीयेच्या मंगलदिनी दरवर्षी हा महा नैवेद्य बाप्पाला दाखवला जातो. याच दिवशी गणरायाचे दर्शन व्हावे, याकरिता भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये गणपती बाप्पांना ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात आला. पुण्यातील आंब्यांचे सुप्रसिद्ध व्यापारी देसाई आंबेवालेचे संचालक मंदार देसाई कुटुंबियांच्यावतीने हा नैवेद्य देण्यात आला.

मंदिरात रविवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सुक्त अभिषेक झाला. त्यानंतर पहाटे ४ वाजता गायिका विदुषी मंजुषा पाटील यांनी स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केली. सकाळी ८ वाजता गणेशयाग देखील झाला. आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना तसेच वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
34.6 ° C
34.6 °
34.6 °
28 %
1.8kmh
3 %
Thu
42 °
Fri
41 °
Sat
40 °
Sun
43 °
Mon
41 °

Most Popular

Recent Comments