31.9 C
New Delhi
Thursday, July 30, 2026
HomeTop Five Newsड्रोन उडविण्यापूर्वी ७ दिवस आधी पोलिसांची परवानगी अनिवार्य

ड्रोन उडविण्यापूर्वी ७ दिवस आधी पोलिसांची परवानगी अनिवार्य

Drone camera | पुणे : पुणे जिल्ह्यात ड्रोनच्या वाढत्या वापरावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे कोणत्याही खासगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट संस्था किंवा व्यावसायिक छायाचित्रकारांना ड्रोन कॅमेऱ्याचा वापर करण्यापूर्वी संबंधित पोलिस ठाण्याची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. ड्रोन उडविण्याबाबतची माहिती किमान सात दिवस आधी पोलिसांना देऊन प्रभारी अधिकाऱ्यांची मान्यता घेणे आवश्यक असल्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी जारी केले आहेत.

जिल्ह्यातील सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पुणे जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे, धरणे, संरक्षणाशी संबंधित संवेदनशील ठिकाणे तसेच केंद्रीय संस्थांचा समावेश असल्यामुळे ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी करून त्याचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेऊन हे प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

अलीकडच्या काळात दौंड, बारामती आणि शिरूर तालुक्यांमध्ये रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन उडत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकारांचा वापर गुन्हेगारी किंवा अतिरेकी कारवायांसाठी होऊ शकतो, अशी शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, वाळूमाफियांकडून बेकायदेशीर उत्खननावर नजर ठेवण्यासाठी किंवा पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळविण्यासाठी ड्रोनचा वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच घरफोडी, चोरी किंवा इतर गुन्हे करण्यापूर्वी परिसराची टेहळणी करण्यासाठीही ड्रोनचा गैरवापर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सुरक्षाव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी हे आदेश जारी करण्यात आले आहेत.

या आदेशांतर्गत केवळ ड्रोनच नव्हे, तर रिमोट-नियंत्रित मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हँग ग्लायडर, हॉट एअर बलून तसेच हवेत उडणाऱ्या तत्सम साधनांच्या वापरावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

ड्रोनच्या माध्यमातून छायाचित्रण किंवा व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या व्यावसायिकांनी कार्यक्रमाचे स्वरूप, ठिकाण आणि वेळ याची माहिती संबंधित पोलिस ठाण्याला सात दिवस आधी देणे आवश्यक राहील. पोलिसांची लेखी परवानगी मिळाल्यानंतरच ड्रोनचा वापर करता येणार आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या आदेशांचे उल्लंघन करून परवानगीशिवाय ड्रोन उडविताना किंवा चित्रीकरण करताना आढळणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी आणि आयोजकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.9 ° C
31.9 °
31.9 °
61 %
5.7kmh
72 %
Thu
32 °
Fri
35 °
Sat
36 °
Sun
37 °
Mon
34 °

Most Popular

Recent Comments