35.8 C
New Delhi
Thursday, July 30, 2026
HomeBlogश्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास 8 कोटी 92 लाखाचे उत्पन्न

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास 8 कोटी 92 लाखाचे उत्पन्न

गरीबांचा विठ्ठल पावला!

पदस्पर्श दर्शन सुमारे ४,९५,०२२ भाविकांनी, तर मुखदर्शन सुमारे ५,४२,००० भाविकांनी घेतले.

vithal mandir News | पंढरपूर- :- आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेच्या चरणी 8 कोटी 92 लाख रुपयांचे दान केले तसेच सोन्या चांदीचे दागिने अर्पण केले असून मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्तनिवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. (vithal mandir)

यंदा आषाढी यात्रा कालावधीत दर्शनरांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना देखील मंदिर समितीने केल्या होत्या. आषाढ शुध्द 01 (दिनांक 15 जुलै) ते आषाढ शुध्द 15 (दिनांक 29 जुलै) या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ 7144078 रुपये अर्पण, 29397076 रुपये देणगी, 8347000 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4631103 रुपये भक्तनिवास, 24032402 रुपये हुंडीपेटी, 1527443 रूपये परिवार देवता तसेच 9672937 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 4520439 इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.

मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ 7505291 रुपये अर्पण, 28833569 रुपये देणगी, 9404340 रुपये लाडू प्रसाद विक्री, 4541458 रुपये भक्तनिवास, 14471348 रुपये हुंडीपेटी, 3245682 रूपये परिवार देवता तसेच 35961768 रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाईल लॉकर आदी माध्यमातून 1245075 रुपये व 3 इलेक्ट्रिक रिक्षा /बस चे 32 लक्ष इतके उत्पन्न प्राप्त झाले होते.

सन 2025 च्या आषाढी यात्रेत रू. 108408531/- व या वर्षीच्या यात्रेत रू. 89272478/- इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत रू. 19136053/- इतकी घट झाल्याचे दिसून येत आहे. या मिळालेल्या दानातून श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या वारकरी भाविकांना पुरेसा प्रमाणात सोई सुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील असे व्यवस्थापक प्रविणकुमार घम यांनी सांगीतले

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
35.8 ° C
35.8 °
35.8 °
44 %
4.9kmh
82 %
Thu
36 °
Fri
35 °
Sat
37 °
Sun
37 °
Mon
35 °

Most Popular

Recent Comments