41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
HomeTop Five Newsएकाचवेळी पटपडताळणी व परीक्षा

एकाचवेळी पटपडताळणी व परीक्षा

राज्यातील शाळांसाठी शिक्षण विभागाचा नवा आराखडा

पुणे : राज्यातील शाळांमध्ये नियतकालिक मूल्यांकन चाचणीदरम्यान विद्यार्थ्यांची पटपडताळणी एकाचवेळी करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या प्रक्रियेला गती देण्यासाठी ११ एप्रिल, १५ एप्रिल आणि २२ एप्रिल या तीन दिवशी शिक्षण विभागाचे पथक शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करणार आहे.

या उपक्रमासोबतच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षाही त्याच दिवशी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ होण्याबरोबरच शाळांवरील अतिरिक्त ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या संदर्भात परिपत्रक जारी केले आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (SCERT) वतीने राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत.

जाहीर वेळापत्रकानुसार इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा अनुक्रमे ११ एप्रिल (प्रथम भाषा), १५ एप्रिल (गणित) आणि २२ एप्रिल (तृतीय भाषा) या दिवशी होणार आहे. याच दिवशी संबंधित वर्गांची पटपडताळणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची मराठी, गणित आणि इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची मराठी, भौतिकशास्त्र व इंग्रजी या विषयांची परीक्षा देखील याच तारखांना आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या एकत्रित नियोजनामुळे परीक्षा व पटपडताळणी प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम होईल, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments