38.2 C
New Delhi
Monday, July 27, 2026
HomeTop Five Newsगणेशभक्तांसाठी शनिवारवाडा–दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवा

गणेशभक्तांसाठी शनिवारवाडा–दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर मोफत पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन सेवा

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टला 'एका eka मोबिलिटी' कडून गणेशभक्तांसाठी उपयुक्त इलेक्ट्रिक वाहन प्रदान

पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांना उन्हाची, पावसाची किंवा ज्येष्ठांसाठी चालण्याची गैरसोय होऊ नये, तसेच त्यांचा मंदिरापर्यंतचा प्रवास अधिक सुलभ आणि आरामदायी व्हावा, या उद्देशाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहनाची देणगी देण्यात आली. शनिवार वाडा ते दगडूशेठ गणपती मंदिर मार्गावर ही सेवा मोफत मिळणार आहे.

गणेशभक्तांच्या सेवेसाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला ‘एका eka मोबिलिटी’ कडून हे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक वाहन नुकतेच प्रदान करण्यात आले. सुधीर मेहता यांच्या कंपनीच्या वतीने हे वाहन ट्रस्टला सुपूर्द करण्यात आले असून त्याचा स्वीकार ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांसह इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी ‘एका eka मोबिलिटी’च्या सुनंदा मेहता, अरिहंत मेहता उपस्थित होते.

या वाहनाचा वापर पहिल्या टप्प्यात शनिवारवाडा ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या मार्गावर गणेशभक्तांच्या मोफत प्रवासासाठी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुणे रेल्वे स्थानक, एसटी स्थानक आदी ठिकाणांहून बाहेरगावाहून येणाऱ्या गणेशभक्तांना मंदिरापर्यंत पोहोचविण्यासाठीही ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले, गणेशभक्तांच्या सेवेसाठी हे अत्यंत आरामदायक व पर्यावरणपूरक वाहन उपलब्ध झाले असून वाहनाच्या उपयोगितेचा खर्चही अत्यंत कमी आहे. या वाहनाचा खर्च सुमारे ५० पैसे प्रति किलोमीटर इतका असल्याने ही सेवा अधिक परिणामकारकपणे राबविणे शक्य होणार आहे.

अरिहंत मेहता म्हणाले, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टसोबत जोडले जाणे हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. गणेशभक्तांच्या सेवेसाठी ही मोफत सेवा सुरू करताना आम्हाला समाधान वाटत आहे. शनिवारवाडा ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर या मार्गावर इलेक्ट्रिक वाहन सेवा सुरू करण्यात येत असून भविष्यात ट्रस्टच्या सहकार्याने ही सेवा अधिक व्यापक करून अधिकाधिक भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न राहील.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
38.2 ° C
38.2 °
38.2 °
35 %
1.6kmh
73 %
Mon
39 °
Tue
38 °
Wed
33 °
Thu
34 °
Fri
37 °

Most Popular

Recent Comments