33.3 C
New Delhi
Sunday, July 26, 2026
HomeTop Five Newsदिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात प्रकरण

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार विमान अपघात प्रकरण

सीआयडी तपास योग्य दिशेने सुरू – अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद


  पुणे : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणाचा गुन्हे अन्वेषण विभागाचा (सीआयडी) तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. या अपघातामागे घातपात आहे का?, निष्काळजीपणा झाला आहे का?, अथवा कोणतेही गुन्हेगारी कृत्य घडले आहे का? या तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी नमूद केले.

लिअरजेट ४५ विमानाचा अपघात

दि. २८ जानेवारी २०२६ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे VSR Ventures कंपनीच्या लिअरजेट ४५ (Learjet 45) विमानाने जात असताना बारामती विमानतळाजवळ उतरताना भीषण अपघात झाला. विमान विमानतळालगतच्या एका शेतात कोसळले आणि त्यानंतर सलग चार ते पाच मोठे स्फोट झाले. या दुर्घटनेत विमानातील सर्व पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, सुरक्षारक्षक विदीप जाधव, क्रू मेंबर पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि को-पायलट कॅप्टन शांभवी पाठक यांचा समावेश होता.

घातपाताचा संशय व राजकीय आरोप

या अपघातात घातपाताचा संशय व्यक्त होताच राजकीय वातावरण ढवळून निघाले. अपघाताच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी व्हीएसआर कंपनीला ऐनवेळी क्लिनचीट देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. तसेच, विमानाचे मूळ दोन पायलट ठरलेले असताना ऐनवेळी त्यांच्यात बदल करण्यात आल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वतंत्र एफआयआर दाखल करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही समजते.

डीजीसीए कारवाई व सरकारी भूमिका

अपघातानंतर विमान नियामक संस्था Directorate General of Civil Aviation (DGCA) यांनी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या चार विमानांच्या उड्डाणांवर तत्काळ बंदी घातली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी १३ निश्चित मुद्द्यांवर चौकशी सुरू असल्याचे जाहीर केले आहे.

सीआयडी तपास

सदर अकस्मात मृत्यूच्या गुन्ह्याचा तपास अत्यंत बारकाईने व काटेकोरपणे करण्यात येत असल्याचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी स्पष्ट केले. घातपात, निष्काळजीपणा आणि गुन्हेगारी कृत्य या तीन प्रमुख शक्यतांच्या अनुषंगाने सीआयडी पथक सखोल चौकशी करत आहे. तपास पूर्ण होण्यापूर्वी कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही त्यांनी सूचित केले.या पत्रकार परिषदेस पोलीस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ आणि पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
33.3 ° C
33.3 °
33.3 °
54 %
3kmh
100 %
Sun
36 °
Mon
39 °
Tue
39 °
Wed
32 °
Thu
35 °

Most Popular

Recent Comments