38.3 C
New Delhi
Monday, July 27, 2026
HomeTop Five Newsपुणेकरांसाठी घराचे सुवर्णस्वप्न!

पुणेकरांसाठी घराचे सुवर्णस्वप्न!

म्हाडा उभारणार तब्बल १० हजार परवडणारी घरे

पुणे शहरासह ग्रामीण भागात गृहनिर्माण प्रकल्प; ऑगस्ट २०२६ ते जून २०२७ दरम्यान लाभार्थ्यांना मिळणार ताबा

पुणे : सर्वसामान्य नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने म्हाडाच्या पुणे मंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. पुणे शहरासह ग्रामीण भागात जवळपास १० हजार परवडणाऱ्या घरांची उभारणी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून, मध्यमवर्गीय आणि अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना याचा मोठा लाभ होणार आहे.

म्हाडा पुणे मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या नव्या गृहनिर्माण योजनेची माहिती देताना सांगितले की, म्हाडाच्या घरांना नागरिकांकडून सातत्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने गृहनिर्माण प्रकल्पांचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातील विविध ठिकाणीही नवीन प्रकल्प राबविले जाणार असून, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत सुमारे १० हजार घरांची उभारणी विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. वाढत्या मागणीचा विचार करून नियोजनबद्ध पद्धतीने प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार असल्याने भविष्यात अधिकाधिक नागरिकांना स्वतःच्या हक्काच्या घराची संधी मिळणार आहे.

याशिवाय, मागील सोडतीत विक्री न झालेल्या किंवा शिल्लक राहिलेल्या सदनिकांसाठी लवकरच दुसरी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात अर्ज करता न आलेले किंवा सोडतीत घर न मिळालेल्या इच्छुकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे.

नवीन गृहनिर्माण प्रकल्पांचे बांधकाम वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहितीही आढळराव पाटील यांनी दिली. नियोजनानुसार ऑगस्ट २०२६ ते जून २०२७ या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना घरांचा प्रत्यक्ष ताबा देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

या योजनेमुळे पुणे आणि परिसरातील परवडणाऱ्या घरांचा पुरवठा वाढण्यास मदत होणार असून, खासगी विकासकांच्या तुलनेत कमी किमतीत विश्वासार्ह घरे उपलब्ध झाल्याने नागरिकांमध्ये या प्रकल्पांविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
38.3 ° C
38.3 °
38.3 °
33 %
0.1kmh
90 %
Mon
39 °
Tue
38 °
Wed
33 °
Thu
34 °
Fri
37 °

Most Popular

Recent Comments