31.1 C
New Delhi
Monday, April 27, 2026
HomeTop Five Newsबारामती पोटनिवडणुकीकडे लक्ष

बारामती पोटनिवडणुकीकडे लक्ष

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदारसंघात एकूण ३ लाख ८३ हजार ७६७ मतदार नोंदविण्यात आले आहेत. मात्र या निवडणुकीत उपमुख्यमंत्री  सुनेत्रा पवार   यांच्याविरोधात कोणता उमेदवार उभा राहणार का, की त्यांची बिनविरोध निवड होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यानंतर राज्याच्या राजकारणात घडामोडी घडत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली. आता त्यांना विधानसभा किंवा विधानपरिषदेचे सदस्य म्हणून निवडून येणे आवश्यक असल्याने बारामतीत पोटनिवडणूक होणार आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदार यादीचे पुनरावलोकन पूर्ण करण्यात आले. ९ फेब्रुवारी रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर नागरिकांकडून आलेल्या हरकती आणि सूचनांची पडताळणी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम यादीप्रमाणे बारामती विधानसभा मतदारसंघात ३ लाख ८३ हजार ७६७ मतदार मतदानासाठी पात्र ठरणार आहेत. मात्र निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान होणार की निवडणूक बिनविरोध होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र विरोधी पक्षांकडून त्यांच्या विरोधात उमेदवार उभा केला जाणार की नाही, याबाबत राजकीय स्तरावर चर्चा सुरू आहे. जर कोणताही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला नाही, तर सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

यामुळे बारामतीतील मतदारांना प्रत्यक्ष मतदानाची संधी मिळणार की निवडणूक बिनविरोध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल होण्याच्या प्रक्रियेनंतरच या पोटनिवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
31.1 ° C
31.1 °
31.1 °
33 %
2.1kmh
7 %
Mon
44 °
Tue
43 °
Wed
40 °
Thu
41 °
Fri
34 °

Most Popular

Recent Comments