36.2 C
New Delhi
Thursday, June 18, 2026
Homeमहाराष्ट्रसीमेवर मराठीचा अभिमान! बिदर जिल्ह्यातील गावांत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात 

सीमेवर मराठीचा अभिमान! बिदर जिल्ह्यातील गावांत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात 

पुणे, –  मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधत कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील सीमावर्ती गावांत मराठीचा जयघोष घुमला. मराठवाडा जनविकास संघ, पुणे आणि शारदा प्रतिष्ठान, भालकी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांत मराठी शाळांचा सन्मान, विद्यार्थ्यांना ग्रंथवाटप आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील भालकी तालुक्यात अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी या सीमावर्ती गावांतील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

मराठवाडा जनविकास संघ, पुणे आणि शारदा प्रतिष्ठान भालकी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.“अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा” या ब्रीदवाक्याला साजेसा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सीमावर्ती भागात मराठी भाषा जपण्यासाठी कार्य करणाऱ्या शाळा आणि शिक्षकांचा ‘सन्मान चिन्ह’ देऊन गौरव करण्यात आला. या उपक्रमामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.कार्यक्रमात मराठी भाषेचे महत्त्व, तिचे संवर्धन आणि सीमावर्ती भागात मराठी टिकवण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज याविषयी प्रबोधनात्मक व्याख्याने झाली. विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याची आवड निर्माण व्हावी आणि संस्कारमूल्ये दृढ व्हावीत यासाठी विविध ग्रंथांचे वाटप करण्यात आले.यामध्ये भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज गाथा यांसारख्या महत्त्वपूर्ण ग्रंथांसह विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात आले. लोकशाही मूल्यांची जाणीव, आध्यात्मिक वारसा आणि अभंगातून संस्कार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.सीमावर्ती भागातील ग्रामस्थ, शिक्षक आणि मराठी प्रेमींनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठी ही आपली मायबोली असून ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता शेजारील राज्यांतील सीमावर्ती भागातही जिवंत ठेवणे हे आपले कर्तव्य असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक व अध्यक्ष अरुण श्रीपती पवार यांनी मार्गदर्शन केले, तर शारदा प्रतिष्ठान भालकीचे विश्वस्त डॉ. दिनकर मोरे यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, प्रा. रविंद्र खांडेकर, सुधाकर थिटे, किशोर अट्टर्गेकर, तुकाराम नारायणराव मोरे, हरिदेव रुद्रमणी, तुकाराम शेडोळे, अमृत अक्रे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
36.2 ° C
36.2 °
36.2 °
33 %
2kmh
6 %
Wed
36 °
Thu
41 °
Fri
42 °
Sat
42 °
Sun
42 °

Most Popular

Recent Comments