31.9 C
New Delhi
Sunday, August 2, 2026
Homeमहाराष्ट्रपुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मोठे बदल

पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये मोठे बदल

आठ शाळांत ‘सीबीएसई’ अभ्यासक्रम 

Education News | पुणे – पुणे महापालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. आगामी शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या आठ शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित सुरू करण्यात येणार असून १४४ शाळांना ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. पुणे महापालिकेच्या शाळांमधील (Education)शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्याअंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून महापालिकेच्या आठ शाळा केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमावर आधारित नव्याने सुरू करण्यात येणार आहेत. ही माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी  दिली.

महापालिकेच्या २०२६–२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात शाळांच्या इमारती बांधकाम व दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे ६८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहरातील शाळांची पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी वापरण्यात येणार आहे.याशिवाय शहरातील ७५ संकुलांमधील एकूण १४४ शाळा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकसित करण्याची योजना आखण्यात आली आहे. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शिक्षण साधने, उत्तम शैक्षणिक वातावरण, तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धती आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या शाळांबाबत पालकांचा विश्वास वाढविण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.दरम्यान, महापालिकेच्या काही शाळांच्या इमारती अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याने त्या शाळांचे स्थलांतर करणे आवश्यक झाले आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जून २०२६ पर्यंत अशा सुमारे १५ शाळांचे स्थलांतर करणे गरजेचे आहे.

यापैकी तीन शाळांचे स्थलांतर आधीच पक्क्या इमारतींमध्ये करण्यात आले आहे. उर्वरित शाळांसाठी पर्यायी व्यवस्था करण्यात येत असून काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याच्या शेडमध्ये वर्ग सुरू करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे. मात्र धोकादायक अवस्थेत असलेल्या इमारतींमध्ये विद्यार्थ्यांना बसविण्यात येणार नाही, असेही प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.महापालिकेच्या शाळांमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे, दर्जेदार शिक्षण देणे आणि विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१० ई-लर्निंग शाळा सुरु होणार सीबीएसईशी संलग्न शा‌ळांसह १० ई-लर्निंग शाळा सुरु करण्याची योजना महापालिकेने तयार केली आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या शहरात केवळ दोन ई-लर्निंग शाळा असून तेथे प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी पालकांचा चांगला प्रतिसाद मिळतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.9 ° C
31.9 °
31.9 °
58 %
2.9kmh
100 %
Sun
36 °
Mon
37 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments