19.6 C
New Delhi
Thursday, February 26, 2026
Homeमनोरंजन“मर्दिनी”चा मुहूर्त शॉट संपन्न

“मर्दिनी”चा मुहूर्त शॉट संपन्न

नवीन वर्षात दमदार मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

श्रे‌यस तळपदे आणि ॲफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. प्रस्तुत आगामी मराठी चित्रपट ‘मर्दिनी’ चा मुहूर्त शॉट नुकताच उत्साहात पार पडला. श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने या चित्रपटाच्या चित्रीकरणाला अधिकृत सुरुवात झाली असून, एक प्रभावी आणि आशयघन सिनेमॅटिक प्रवास सुरू झाला आहे.

मनोरंजनाच्या चौकटीपलीकडे जाऊन प्रत्येक स्त्रीच्या सामर्थ्याची, सहनशक्तीची आणि अंतःशक्तीची गाथा उलगडणारा ‘मर्दिनी’ हा चित्रपट समाजाला आरसा दाखवणारा ठरणार आहे. “प्रत्येक स्त्री ही मुळात मर्दिनी असते… वेळ आली की ती आपले खरे रूप दाखवते” या विचारावर आधारित हा सिनेमा स्त्रीशक्तीचे विविध पैलू प्रभावीपणे मांडतो.

चित्रपटात मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार कलाकारांचा भक्कम ताफा पाहायला मिळणार आहे. प्रार्थना बेहेरे, अभिजीत खांडकेकर, जितेंद्र जोशी, राजेश भोसले यांच्यासह बालकलाकार मायरा वैकुळचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अनुभवी कलाकारांचा अभिनय आणि नव्या पिढीची संवेदनशील उपस्थिती यामुळे कथानक अधिक परिणामकारक आणि स्मरणात राहणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या चित्रपटातून अजय मयेकर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत असून, निर्मितीची जबाबदारी दीप्ती तळपदे यांनी सांभाळली आहे. दमदार विषय, सशक्त अभिनय आणि प्रभावी मांडणी यांचा संगम असलेला ‘मर्दिनी’ हा चित्रपट २०२६ साली मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना एक वेगळा आणि अर्थपूर्ण सिनेमॅटिक अनुभव देण्याचे आश्वासन देतो.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
19.6 ° C
19.6 °
19.6 °
17 %
2.5kmh
0 %
Thu
31 °
Fri
33 °
Sat
34 °
Sun
34 °
Mon
31 °

Most Popular

Recent Comments