31.9 C
New Delhi
Sunday, August 2, 2026
HomeTop Five Newsपुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी सुविधा

पुणे मेट्रो प्रवाशांसाठी मोठी सुविधा

तीन स्थानकांवर नवी प्रवेशद्वारे उद्यापासून सुरू

पुणे : पुणे मेट्रो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने तीन महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवार, दि. १४ फेब्रुवारी २०२६ पासून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट या मेट्रो स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात येणार आहेत.

या नवीन प्रवेशद्वारांमुळे मेट्रो प्रवाशांना वर्दळीचे मुख्य रस्ते ओलांडण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्हीची बचत होणार असून सुरक्षिततेतही मोठी वाढ होणार आहे. शहरातील वाढती प्रवासी संख्या आणि त्यांच्या सोयीचा विचार करून पुणे मेट्रो प्रशासनाने ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पिंपरी-चिंचवड मनपा मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ३)

पिंपरी-चिंचवड मनपा मेट्रो स्थानकाचे नवीन प्रवेशद्वार पुणे-मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला आहे. हे प्रवेशद्वार सुरू झाल्यामुळे पिंपरी शहरातून मेट्रो स्थानकात येणाऱ्या तसेच स्थानकातून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची गरज राहणार नाही. यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांनाही मोठी सोय होणार आहे.

स्वारगेट मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ५)

स्वारगेट मेट्रो स्थानकाचे नवीन प्रवेशद्वार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानकाच्या बाजूला सुरू करण्यात येणार आहे. हा मार्ग भुयारी स्वरूपाचा असून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे स्वारगेट परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. तसेच जेधे चौक ओलांडण्यासाठी प्रवाशांना मुख्य रस्त्यावर येण्याची गरज भासणार नाही.

शिवाजीनगर मेट्रो स्थानक (प्रवेशद्वार क्र. ३)

शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचे नवीन प्रवेशद्वार आकाशवाणी केंद्राजवळील शिमला ऑफिस चौक येथे उभारण्यात आले आहे. हा मार्ग देखील भुयारी असून गणेशखिंड रस्ता किंवा कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रो स्थानक गाठणे अधिक सुलभ होणार आहे. या प्रवेशद्वारामुळे शिवाजीनगर मेट्रो स्थानकाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना मुख्य रस्त्याशी थेट जोडणी मिळणार आहे.

याबाबत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, मेट्रो प्रवाशांची वाढती संख्या आणि त्यांच्या सोयी लक्षात घेऊन ही नवीन प्रवेशद्वारे सुरू करण्यात येत आहेत. विशेषतः मुख्य रस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या प्रवेशद्वारांचा मोठा फायदा होणार असून मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.9 ° C
31.9 °
31.9 °
58 %
2.9kmh
100 %
Sun
36 °
Mon
37 °
Tue
35 °
Wed
35 °
Thu
28 °

Most Popular

Recent Comments