31.9 C
New Delhi
Friday, July 31, 2026
HomeTop Five Newsआंदोलनाला परवानगी दिल्यास भाजपलाही समान संधी द्यावी!

आंदोलनाला परवानगी दिल्यास भाजपलाही समान संधी द्यावी!

पुण्यात राजकीय तापमान वाढले

पुणे- : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या प्रस्तावित पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसकडून आंदोलनाची तयारी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षानेही प्रतिआंदोलनाचा इशारा देत पोलीस प्रशासनाकडे भूमिका स्पष्ट केली आहे.(political)

शनिवारी (१ ऑगस्ट) होणाऱ्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. काँग्रेसच्या आंदोलनाला परवानगी दिली जाणार असल्यास भाजपलाही लोकशाही मार्गाने प्रतिआंदोलन करण्यासाठी समान परवानगी देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

भाजपच्या निवेदनात काँग्रेसवर राजकीय हेतूने शहरातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात घेतलेल्या विविध निर्णयांचा उल्लेख केला आहे. कलम ३७० रद्द करणे, नक्षलवादाविरोधातील कठोर धोरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणारे निर्णय यांचा संदर्भ देत अमित शहा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

काँग्रेसने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यास भारतीय जनता पक्षही लोकशाही पद्धतीने प्रतिआंदोलन करेल आणि त्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी, अशी भूमिका भाजपने स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रशासनासमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पोलीस आयुक्तांना निवेदन देताना नगरसेवक रवींद्र साळेगावकर, राघवेंद्र मानकर, पुनीत जोशी, दीपक पोटे, विश्वास ननावरे, सुशील मेंगडे, अमर आवळे, मनीषा लडकत, दुष्यंत मोहोळ आणि पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
31.9 ° C
31.9 °
31.9 °
61 %
5.7kmh
72 %
Thu
32 °
Fri
35 °
Sat
36 °
Sun
37 °
Mon
34 °

Most Popular

Recent Comments