41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
HomeTop Five Newsधामणीत पाडव्याच्या मुहर्तावर खंडोबाला चंदन उटी

धामणीत पाडव्याच्या मुहर्तावर खंडोबाला चंदन उटी

मंचर :’ पालवी चैञाची अथांग स्नेहाची.’ जपवणूक परंपरेची,उंच उंच जाऊ दे गुढी आदर्शाची,’ उन्नतेची आणि स्वप्नपूर्तीची,अशा एकमेकांना शुभेच्छा देत आंबेगांव तालुक्यातील पूर्व भाग परिसरामध्ये गुरुवारी (१९ मार्च) हिंदू नववर्षाचा पहिला दिवस व साडेतीन मूहर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा सण अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला.गुढीपाडव्यानिमित्त पुरातन धामणी येथील खंडोबा मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गुढीपाडव्याच्या मुहर्तावर शेकडो भाविकांनी “सदानंदाचा येळकोट,जय मल्हारच्या नामघोषात धामणी (तालुका आंबेगांव) येथील पुरातन श्री म्हाळसाकांत खंडोबाचे दर्शन घेतले.गुढीपाडव्याच्या निमित्ताने खंडेरायाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगावर चैञ महिण्यातील पहिली वासंतिक चंदनउटी साकारण्यात आली.खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या व स्वयंभू सप्तशिवलिंगावर साकारलेल्या चंदनउटीचे मनमोहक रुप पाहाण्यासाठी तसेच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.तत्पूर्वी धामणीच्या पुरातन खंडोबा मंदिरात पहाटे चार वाजता घंटानाद झाला.त्यानंतर पहाटे पांच वाजता नारायण डोके व सौ कल्याणी डोके (खडकवाडी)उत्तम विधाटे व सौ शारदा विधाटे (धामणी)बाळासाहेब गाढवे व सौ कमल गाढवे (धामणी)सोमनाथ वीर व सौ निशा वीर (पहाडदरा)सतीष दौलतराव जाधव व सौ प्रिंयाका जाधव (घोडेगांव)सुहास तांबे व सौ.सुनिता तांबे (धामणी)जगन्नाथ विधाटे व सौ चंपा विधाटे (धामणी)या सात जोडप्याच्या हस्ते वसंत पूजा व दुग्धाभिषेक व रुद्राभिषेक संपन्न झाला.खंडेराय.म्हाळसाई. बाणाई व जोगेश्वरीच्या देखण्या मूर्तीना पाडव्याची साखरगाठी अर्पण करण्यात आली.

साखरघाटी अर्पण केल्यानंतर देवस्थानाचे सेवेकरी प्रभाकर भगत.दादाभाऊ भगत.सुभाष तांबे.शांताराम भगत.धोंडीबा भगत.नामदेव भगत.अनिरुध्द वाळूंज. यांच्याकडून स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या सर्वांगसुंदर देखण्या खंडोबा.म्हाळसाई व बाणाईच्या मुखवट्यावर सुवासिक केशर.व सुंगधी दवण्याचे अत्तरमिश्रित चंदनाचा लेप देण्यात आला.त्यानंतर खंडोबाला द्राक्षाचा हार व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात येऊन शेकडो भाविकांच्या उपस्थितीत आरती करण्यात आली.सुवासिक चंदनाचे लेपन करत असताना मंदिराच्या सभामंडपात टाळमृदुंगाच्या भक्तिमय स्वरात उटीभजनाच्या जयघोषाची सुरुवात होऊन देवाच्या उटीचे अभंग भक्तीमय वातावरणात गायले जात होते. तर मंदिराच्या आवारात समस्त पंचरास मंडळीच्या पारंपारिक वाद्याच्या सनईतून मंगलमय स्वरात भक्तिमय भैरवी गायल्या जात होत्या वसंत ॠतुच्या उष्म्याची दाहकता कमी करण्यासाठी मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात झेंडू.गुलाब.अष्टरच्या फुलांची सजावट पोंदेवाडीचे बाळशिराम साळगट यांनी तर धामणीचे युवराज बढेकर यांनी मंदिराच्या गाभार्‍यात व सभामंडपात आकर्षक विद्युत रोषणाई केलेली होती.मंदिराचे आवारात व सभोवताली भल्या पहाटे महेश्वरी आळेकर यांनी आकर्षक रांगोळ्या काढलेल्या होत्या.पहाटे मंदिरात स्वयंभू शिवलिंगाला चंदनाची उटी लेपन केल्यानंतर उपस्थित भाविकांच्या कपाळाला चंदनउटी व भंडारा लावण्यात आला.वासंतिक चंदनउटी सोहळ्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले.वासंतिक उटी सोहळ्यामुळे देवस्थान व परिसरातील वातावरण आध्यात्मिक उर्जेने ढवळून निघते.चंदनाच्या उटीने उन्हाचा दाह आणि हरीनामाच्या भजनाने आत्मीक शितलता निर्माण होण्यास मदत होते असे यावेळी सेवेकरी व भाविकांनी सांगितले.गुढीपाडव्याच्या निमित्ताने खंडोबाचे दर्शनासाठी पुणे.नगर.नाशिक मुंबई.भोसरी.पिंपरी चिंचवड जिल्ह्यातील भाविक आलेले होते बहुसंख्य भाविक चारचाकी व दुचाकी वाहनाने येत होते.मंदिराच्या बाहेर तळीभंडार फुल पेढे विक्रीची दुकाने थाटलेली होती. दुपारनंतर भाविकांची तुरळक ये—जा सुरु होती.गुढीपाडव्याच्या निमित्ताने गुरुवारी घरोघरी मांगल्य आणि समृध्दीची गुढी उभारण्यात आली गुढीपाडव्यानिमित्त सकाळपासून घरोघरी तयारी सुरु झाल्याचे पाहावयास मिळाले यावेळी महिलांनी पहाटेपासून दारात सडा टाकून रांगोळ्या घातल्या.आणि सकाळी सातच्या नंतर उगवती सूर्याच्या साक्षीने घरोघरी लाकडी काठीला नटवून गुढ्या उभारल्या गेल्या यानिमित्ताने सगळे कुटुंब एकवटून गुढीची पारंपारिक पध्दतीने मनोभावे पूजा करण्यात आली.धामणीच्या महादेव मंदिराच्या ओट्यावर नववर्षाच्या पंचांगाचे विधिवत पूजन आणि वाचन करण्यात आले.वर्षभरातील पावसाच्या अंदाजाचे व पीकपाणी.धान्य उत्पादन हवामान संबधीचे पंचागातील भविष्य वाचन करुन सांगण्यात आले.यावेळी पावसाचे भविष्य श्रवण करण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केलेली होती. खंडोबाला ६६ वर्षानी चंदनउटी धामणी येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा मंदिर पुरातन असून या मंदिराला संत ज्ञानेश्वर.संत तुकाराम यांचा पदस्पर्श लाभलेला आहे सन १९५८ साली पिंपळनेर (ता.पारनेर)येथील संत निळोबाराय यांचे तत्कालीन वंशज ह.भ.प.मकाशीर महाराज पिंपळनेरकर यांच्या आज्ञेनुसार धामणी खंडोबाच्या स्वयंभू सप्तशिवलिंगाला चंदनउटी घालण्यात आलेली होती त्यावेळी खंडोबा मंदिरातील चंदनउटीसाठी दिवंगत राजाराम बेल्हे.गोपाळ देखणे.बाबुरावदादा पाटील.सिताराम वामने.नानाबुवा शंकर विधाटे.नानाभाऊ रोकडे.हणमंतराव बोर्‍हाडे.बेरी गुरुजी.सखाराम तांबे गुरुजी.भागूजी भगत.मालू भगत.गोविंद भगत.या मंडळीचा सक्रीय सहभाग होता.आज या मंडळीपैकी कोणीही हयात नाही त्यानंतर काही अडचणीमुळे चंदनउटी सोहळ्यात खंड पडलेला होता.सन २०२४ पासून धामणी ग्रामस्थांनी ६६वर्षानी चंदनउटी लेपन सोहळा सुरु केला असून गुढीपाडव्याबरोबर.चैञ पौर्णिमा.व अक्षयतृतीया या सणाच्या दिवशी चंदनउटी सोहळा खंडोबा मंदिरात होतो असे देवस्थानचे सेवेकरी दादाभाऊ भगत यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments