28.1 C
New Delhi
Saturday, May 2, 2026
HomeTop Five News पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईमुळं लग्नांवर अनिश्चिततेचं सावट

 पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईमुळं लग्नांवर अनिश्चिततेचं सावट

पिंपरी-चिंचवड – राज्यात सगळीकडं पुढील दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर लग्न सोहळ्यांची लगबग सुरू आहे. परंतु, अचानक निर्माण झालेल्या गॅस टंचाईमुळं लग्नसराईवर मोठं संकट ओढावलं आहे. आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळं व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याचा थेट फटका शहरातील केटरग व्यवसायाला बसताना दिसत आहे. परिणामी, अनेक केटरर्सनी लग्न समारंभातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करायला सुरुवात केली आहे. त्यामुळं शहरातील हजारो कुटुंबांच्या आनंदाच्या क्षणांवर चिंतेचं सावट पसरलं आहे.


केटरर्ससमोर मोठं संकट : पिंपरी-चिंचवड शहरात लग्नाच्या मुहूर्ताच्या दिवशी साधारणपणे ४०० ते ५०० सोहळे पार पडतात. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत सुमारे ३० लग्नाचे मुहूर्त असल्यामुळं या काळात किमान १० ते १२ हजार लग्न सोहळे होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या सर्व लग्न सोहळ्यांच्या जेवणाच्या ऑर्डर शहरातील नोंदणीकृत सुमारे ४५० केटरर्स तसंच अन्य लहान केटरर्स घेतात. मात्र, लग्नसराई सुरू होण्याच्या तोंडावरच गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानं केटरर्ससमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे.
लग्नाच्या तयारीत असलेल्या घरात चिंतेंचं वातावरण : व्यावसायिक गॅस सहज उपलब्ध होत नसल्यामुळं अनेक केटरर्सनी घेतलेल्या ऑर्डर रद्द करायला सुरुवात केली आहे. काही केटरर्सनी तर वधू-वरांच्या कुटुंबीयांना याबाबत निरोप देण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळं अनेक कुटुंबांना लग्न सोहळा पुढं ढकलण्याचा विचार करावा लागत आहे. लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांमध्ये यामुळं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
लग्न पुढं ढकलावं का? : गणेश जगताप आणि पंडित वाळके यांसारख्या लग्नसराईच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांनी सांगितले की, ”लग्नासाठी हॉल, डेकोरेशन, वाजंत्री यांसारख्या अनेक गोष्टींची आगाऊ बुकग केलेली असते. मात्र, केटरग व्यवस्था कोलमडल्यास संपूर्ण विवाह समारंभाचं नियोजन विस्कळीत होण्याची भीती आहे. त्यामुळं आता लग्न पुढं ढकलावं लागेल का?, अशी चिंता मनात निर्माण झाली आहे”.
वधू-वरांच्या खिशावर होणार परिणाम : काही केटरर्स गॅसची जुळवाजुळव करण्यासाठी अधिक पैसे मोजत आहेत. मात्र यामुळं त्यांच्या खर्चात मोठी वाढ होत असल्यानं ते प्रति थाळीमागं १० ते २० टक्क्‌‍यांपर्यंत दरवाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळं लग्नसमारंभातील मेजवानीचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे. त्याचा थेट परिणाम वधू-वरांच्या कुटुंबीयांच्या खिशावर होणार आहे. पिंपरी-चिंचवड केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे यांनी सांगितले की, ”शहरात सुमारे ४५० केटरर्स कार्यरत आहेत. त्यांच्याकडं अंदाजे ४५ हजार कामगार काम करतात. गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर केटरर्सना मोठा आर्थिक फटका बसू शकतो. तसंच हजारो कामगारांच्या रोजगारावर गंडांतर येण्याची शक्यता आहे”.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
28.1 ° C
28.1 °
28.1 °
61 %
3.1kmh
2 %
Fri
32 °
Sat
41 °
Sun
42 °
Mon
40 °
Tue
38 °

Most Popular

Recent Comments