41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
Homeआरोग्यइंदिरा आयव्हीएफ ने हडपसर येथे नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे केले उद्घाटन

इंदिरा आयव्हीएफ ने हडपसर येथे नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे केले उद्घाटन

पुणे, : इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल लिमिटेडने ४१ सिटी हब, दुसरा मजला, श्री स्वामी समर्थ नगर, गाडीतळ, हडपसर, पुणे येथे आपल्या नवीन फर्टिलिटी क्लिनिकचे उद्घाटन पुणे महानगर पालिकाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवनीत कौर यांच्या हस्ते करणात आले त्यावेळी नगरसेवक योगेश मुळीक, इंदिरा आयव्हीएफचे झोनल बिझनेस डायरेक्टर डॉ. अमोल लुंकड, डॉ. इशिता लुंकड, हडपसर सेंटर हेड डॉ. ईशा कपूर सह अन्य मान्यवर ही उपस्थित होते.

या नव्या केंद्राच्या सुरूवातीमुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना अधिक सुव्यवस्थित, सुरक्षित आणि सुलभ प्रजनन उपचार सुविधा उपलब्ध होणार आहेत. फर्टिलिटी आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेसच्या सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे केंद्र रुग्णांना स्टॅण्डर्ड क्लिनिकल प्रोटोकॉल, पेशंट सेफ्टी सिस्टीम आणि तंत्रज्ञानाधारित उपचार पद्धतींच्या माध्यमातून पारदर्शक, सुरक्षित आणि स्थिर उपचार सेवा उपलब्ध करून देईल.

मुख्य अतिथी पुणे महानगर पालिकाच्या अतिरिक्त आयुक्त श्रीमती पवनीत कौर म्हणाल्या की ,स्थानिक स्तरावर हेल्थकेअर इन्फ्रास्ट्रक्चर बळकट करणे हा प्रदेशाच्या दीर्घकालीन आरोग्य गरजांचा विचार करता अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हडपसरमधील इंदिरा आयव्हीएफची सुरुवात कुटुंबांना संघटित फर्टिलिटी केअर अधिक जवळ आणणारी आहे आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये योग्य वेळी मिळणाऱ्या सल्ला सेवेच्या महत्त्वावर प्रकाश टाकते

विशेष अतिथी नगरसेवक योगेश मुळीक म्हणाले,स्थानिक स्तरावर आरोग्य सेवांची उपलब्धता हा मजबूत समाज व सक्षम कुटुंबांचा पाया आहे. इंदिरा आयव्हीएफचे नवीन केंद्र फर्टिलिटी अवेअरनेस वाढवण्यासोबतच वेळेवर वैद्यकीय सल्ला घेण्यास योग्य प्रोत्साहन देईल. अशा उपक्रमांमुळे संपूर्ण आरोग्यव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होतो.

इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटल लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीज मुर्डिया म्हणाले, हडपसरमधील हा विस्तार फर्टिलिटी केअर अधिक सुलभ आणि विश्वासार्ह करण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग आहे. जागरूकता वाढत आहे आणि रुग्ण लवकरच्या टप्प्यातच संगठित मार्गदर्शन शोधत आहेत; अशावेळी अनुभवी वैद्यकीय टीमच्या साहाय्याने एव्हिडन्स बेस्ड उपचार देणे अत्यंत आवश्यक ठरते.

इंदिरा आयव्हीएफ हडपसर सेंटर हेड डॉ. ईशा कपूर म्हणाल्या, आमचे ध्येय असे उपचार वातावरण निर्माण करणे आहे, जिथे वैद्यकीय उपचारासोबतच भावनिक आधारही मिळेल. फर्टिलिटी केअर हा केवळ विज्ञानाचा विषय नाही; यात आत्मीयता आणि सहानुभूती यांचीही तितकीच गरज असते. आमची टीम दोन्ही दृष्टीकोन समोर ठेवून कार्य करेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments