30 C
New Delhi
Tuesday, July 21, 2026
Homeमहाराष्ट्रअण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिव जयंतीनिमित्त शिव व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात शिव जयंतीनिमित्त शिव व्याख्यानमाला उत्साहात संपन्न

पुणे –  पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पुणे बहि:शाल शिक्षण मंडळ संयुक्त विद्यमाने गरजेवर आधारित कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेत प्रा. डॉ. गणेश राऊत यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य, डॉ. प्रकाश पांढरमिसे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन, गजानन शिंदे यांनी लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक केंद्र कार्यवाह प्रा. डॉ. नाना झगडे यांनी केले.

छत्रपतींचे व्यवस्थापन कौशल्ये हे आजच्या युवकांसाठी आदर्शवत आहे. ध्येय निश्चिती, संयम आणि संकटातही डगमगून न जाता मार्ग काढण्याचे कौशल्ये आत्मसात करावे. महाराजांच्या विचारांचे आचरण करावे. असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी व्यक्त केले.

प्रख्यात इतिहास तज्ञ प्रा. डॉ. गणेश राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे स्वराज्य निर्माण केले. त्यांनी मराठा साम्राज्य कसं घडलं आणि कसं वाढलं, मराठ्यांच्या इतिहासाचा तत्कालीन जीवनावर काय परिणाम झाला हे त्यांनी रंजक शब्दांत सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आखलेल्या योजना आणि धोरणे ही राज माता जिजाऊ यांच्याशी सल्लामसलत करून राबविली. खऱ्या अर्थाने राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्य निर्मितीचे स्वप्न साकारले. असे डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी सांगितले.  गजानन शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोक कल्याणकारी राज्याचे दाखले देत त्यांच्या गड किल्यांचे बांधकाम, गुप्तचर यंत्रणा, गनिमीकावा, युद्ध नीती याविषयी ओघवत्या शैलीत प्रकाश टाकला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी, डॉ. प्रशांत मुळे, प्रा. दिलीप देशमुख, डॉ. दत्तात्रय संकपाळ, प्रा. संजय कामठे, डॉ. अजिनाथ डोके, प्रा.अभिलाश जगताप, प्रा. सुनील वाघमोडे, प्रा. गौरव शेलार, प्रतीक कामठे, प्रा. सुनील भोपे तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सूत्रसंचालन डॉ. अश्विनी घोगरे यांनी केले तर आभार प्रा. प्रतीक कामठे यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
30 ° C
30 °
30 °
69 %
4.6kmh
100 %
Tue
30 °
Wed
33 °
Thu
35 °
Fri
36 °
Sat
30 °

Most Popular

Recent Comments