39.6 C
New Delhi
Saturday, July 11, 2026
Homeमहाराष्ट्रआठव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात प्रा. यास्मिन शेख व डॉ. अविनाश चाफेकर यांना...

आठव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनात प्रा. यास्मिन शेख व डॉ. अविनाश चाफेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

पुणे, – कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने येत्या 21 व 22 फेब्रुवारी रोजी होणार्‍या आठव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषेच्या जतनासाठी आपले आयुष्य समर्पण करणार्‍या ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ प्रा. यास्मिन शेख यांना “शिक्षणप्रेमी शांतारामशेठ शहासने” जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर यांना “कवयित्री उर्मिलाताई कराड” जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने व संयोजिका तेजाली शहासने यांनी आज येथे दिली.


“अनुवादातून राष्ट्रभक्ती” या संकल्पनेला वाहिलेले हे संमेलन फिरोदिया ऑडिटोरियम, फर्ग्युसन महाविद्यालय (प्रवेश गेट नं.4), पुणे येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अनुवादक डॉ. शुचिता फडके असून ज्येष्ठ अनुवादक डॉ. रवींद्र गुर्जर हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. शनिवारी (21 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता खा. डॉ. मेधा कुलकर्णी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. हे संमेलन सर्वांसाठी विनामूल्य खुले असून अनुवादासंबंधीच्या जिज्ञासूंनी, संशोधकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या संमेलनात अवश्य सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी (21 फेब्रुवारी) अनुवादविषयक व्याख्याने व चर्चासत्रांमध्ये विविध मान्यवरांचा सहभाग राहणार आहे. यामध्ये कृत्रिम बुध्दीमत्ता आणि अनुवाद (डॉ. प्रांजली देशपांडे), प्रशासकीय सेवेतील अनुवादाच्या संधी व क्रांतीकारक साधने (सुश्रुत कुलकर्णी), पेटंट व शास्त्रीय अनुवाद (दीपक झेमसे), अनुवादातील खाचाखोचा (विदुला टोकेकर) आणि डॉ. शुचिता फडके यांचे राष्ट्रनिर्मितीसाठी अनुवाद या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. दुसर्‍या दिवशी (22 फेब्रुवारी) सकाळी 10 वाजता ओळख देशभक्तांची या उपक्रमाचा संकल्पपूर्ती समारंभ लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे व दुपारी 12 वाजता जीवनगौरव पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विवेक भोसले, पर्यावरणप्रेमी डॉ. स्वयंंप्रभादेवी मोहिते पाटील, मराठीकाका अनिल गोरे उपस्थित राहणार आहेत. प्रकाशक व साहित्यप्रेमी भालचंद्र कुलकर्णी व प्रा. वैशाली कार्लेकर हे संमेलनाचे निमंत्रक आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
39.6 ° C
39.6 °
39.6 °
28 %
4.6kmh
76 %
Sat
39 °
Sun
42 °
Mon
42 °
Tue
41 °
Wed
41 °

Most Popular

Recent Comments