34 C
New Delhi
Monday, July 27, 2026
Homeमहाराष्ट्ररणसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा सुरु

रणसिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा सुरु


इंदापूर-
कळंब ता. इंदापूर येथील इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित विश्वासराव रणसिंग महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी बसची सुविधा सुरू करण्यात आली.बस सुविधाचे उद्घाटन इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश कदम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक काळंगे, उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, उपप्राचार्य डॉ. प्रशांत शिंदे व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.संस्था सचिव विरसिंह रणसिंग यांच्या संकल्पनेतुन संस्थेने विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन बस सुविधा उपलब्ध केली आहे.या सुविधाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश कदम यांनी केले.
संस्था नेहमीच विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध सुविधा व सेवा देण्यासाठी सदैव तत्पर असते.परिसरातील मुला मुलीच्या येण्यासाठी व जाण्यासाठी सोयीस्कर अशी बस चालु केल्यामुळे विद्यार्थी व पालक यांनी समाधान व्यक्त केले आहे.संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थीना शैक्षणिक प्रगतीसाठी आधुनिक व भौतिक सुविधा दर्जेदारपणे देण्यासाठी संस्था आग्रही असल्याचे संस्थेचे सचिव वीरसिंह रणसिंग यांनी सांगितले.
प्राचार्य डॉ.अशोक काळंगे यांनी संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक केले.विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल असे मत व्यक्त केले. उपप्राचार्य प्रा. ज्ञानेश्वर गुळीग, डॉ. सुहास भैरट यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी नातेपुते- रेडणी – तावशी- लासुर्णे – जंक्शन- शेळगांव या गावातून नियमित बस सेवा सुरु राहणार असून या गावालगतच्या परिसरातील विद्यार्थी यांनी याचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक काळंगे यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
34 ° C
34 °
34 °
47 %
2kmh
40 %
Sun
34 °
Mon
38 °
Tue
38 °
Wed
35 °
Thu
33 °

Most Popular

Recent Comments