41.8 C
New Delhi
Thursday, July 16, 2026
Homeमहाराष्ट्र'सांस्कृतिकदृष्ट्या वर्ष सुखसमृद्धीचे जावो’

‘सांस्कृतिकदृष्ट्या वर्ष सुखसमृद्धीचे जावो’

नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कलावंत गुढी

पुणे : नवीन वर्षात उत्तमोत्तम नाट्य कलाकृतींची निर्मिती व्हावी आणि रसिकांना त्यांचा भरभरून आनंद घेता यावा. कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिक यांना सांस्कृतिकदृष्ट्या हे वर्ष सुखसमृद्धीचे जावो, अशा शुभेच्छा प्रसिद्ध अभिनेते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष योगेश सोमण, प्रसिद्‌ध अभिनेते आनंद इंगळे यांनी दिल्या.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात दरवर्षीप्रमाणे यंदाही कलावंत गुढी उभारण्यात आली. त्या वेळी सोमण आणि इंगळे यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गोष्ट इथे संपत नाही’ या कार्यक्रमाचे सादरकर्ते सारंग मांडके, सारंग भोईरकर यांच्यासह नाट्य परिषदेच्या कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, अनुराधा हटकर, गणेश भोसले आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात समीर हंपी यांनी उपक्रमाविषयी माहिती विशद केली तर सत्यजित धांडेकर यांनी आभार मानले. कलाकरांचा सत्कार सत्यजित धांडेकर, दीपक गुप्ते, सुनील महाजन, अनुराधा हटकर, गणेश भोसले यांनी केला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल, योगेश सोमण,  सुनील महाजन यांचा सत्कार आनंद इंगळे यांच्या हस्ते करण्यात आला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
scattered clouds
41.8 ° C
41.8 °
41.8 °
23 %
5kmh
30 %
Thu
42 °
Fri
42 °
Sat
40 °
Sun
39 °
Mon
37 °

Most Popular

Recent Comments