31.4 C
New Delhi
Sunday, July 26, 2026
Homeमहाराष्ट्रपीएमपीच्या सर्व बसमध्ये बसणार सीसीटीव्ही कॅमेरे

पीएमपीच्या सर्व बसमध्ये बसणार सीसीटीव्ही कॅमेरे

विनयभंग, चोरी व अपघातांवर नियंत्रणासाठी निर्णय; रोहन सुरवसे-पाटील यांच्या मागणीला यश

पुणे, पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमधील विनयभंग, चोरी आणि अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहन सुरवसे-पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर पीएमपीएमएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

सुरवसे-पाटील यांनी एप्रिल २०२६ च्या पहिल्या आठवड्यात पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांना लेखी निवेदन देऊन सर्व बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली होती. त्यानंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत उर्वरित बसमध्येही ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.

सध्या पीएमपीच्या ताफ्यातील सुमारे ३० ते ३५ टक्के बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे उपलब्ध नसल्याचे सुरवसे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे बसमधील गुन्हेगारी घटनांमध्ये आरोपींची ओळख पटविणे आणि पुरावे गोळा करणे कठीण जात होते. विशेषतः गर्दीच्या वेळेत महिलांशी गैरवर्तनाच्या घटना घडत असून, पुराव्याअभावी कारवाईत अडचणी येत होत्या.

सध्या वातानुकूलित तसेच नव्याने दाखल झालेल्या बसमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उपलब्ध आहे. आता उर्वरित जुन्या बसमध्येही टप्प्याटप्प्याने कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. तसेच बसमधील सीसीटीव्ही फुटेजचे प्रभावी निरीक्षण व देखरेख करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

व्यवस्थापकीय संचालक महेश आव्हाड यांनी प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेतल्याबद्दल सुरवसे-पाटील यांनी त्यांचे आभार मानले. या निर्णयामुळे बसमधील विनयभंग, चोरी आणि इतर गैरप्रकारांवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
31.4 ° C
31.4 °
31.4 °
59 %
3.3kmh
100 %
Sun
36 °
Mon
39 °
Tue
37 °
Wed
33 °
Thu
32 °

Most Popular

Recent Comments