30.1 C
New Delhi
Wednesday, April 15, 2026
Homeमहाराष्ट्रदुभाजक दुरुस्ती करा; बेकायदेशीर तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- रोहन सुरवसे-पाटील

दुभाजक दुरुस्ती करा; बेकायदेशीर तोडफोड करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा- रोहन सुरवसे-पाटील

पुणे : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कात्रज ते खंबाटकी घाट पायथा दरम्यान अनेक ठिकाणी महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करण्यात आल्याने अपघातांचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित दुभाजकांची तातडीने दुरुस्ती करून दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते रोहन सुरवसे पाटील यांनी केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम तसेच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कात्रज ते खंबाटकी घाट पायथा या दरम्यान काही हॉटेल तसेच व्यावसायिक आस्थापनांकडून महामार्गाच्या दुभाजकांना तोडून थेट प्रवेशमार्ग तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे सेवा रस्त्यावरून येणारी वाहने अचानक महामार्गावर प्रवेश करत असून, महामार्गावरील वेगवान वाहतुकीमुळे अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यामुळे या मार्गावरील ज्या ठिकाणी दुभाजक तोडण्यात आले आहेत, त्या सर्व ठिकाणांची तातडीने पाहणी करून दुभाजकांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे.

तसेच महामार्गावरील दुभाजक बेकायदेशीररित्या तोडून अनधिकृत जोडरस्ते तयार करणाऱ्या संबंधित व्यक्ती, हॉटेल चालक किंवा आस्थापनांविरुद्ध चौकशी करून संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

भविष्यात अशा प्रकारचे बेकायदेशीर प्रकार पुन्हा होऊ नयेत यासाठीही कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सुरवसे-पाटील यांनी निवेदनातून केली आहे.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिपसिह गिल्ल आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता अंकित यादव यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
haze
30.1 ° C
30.1 °
30.1 °
26 %
1.5kmh
20 %
Tue
32 °
Wed
39 °
Thu
40 °
Fri
42 °
Sat
41 °

Most Popular

Recent Comments