38.1 C
New Delhi
Thursday, April 16, 2026
Homeमहाराष्ट्रचिंचवडला श्रीराम कथा महोत्सवाची सांगता

चिंचवडला श्रीराम कथा महोत्सवाची सांगता

पिंपरी, –

येथील लिंक रोडवरील आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून आयोजित ‘ श्रीराम कथा’ महोत्सवाची गुरुवारी (ता. २६ ) सांगता झाली. या महोत्सवाला
ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्व सभासदांनी या महोत्सवाला उदंड प्रतिसाद दिला.
ह.भ.प. माधव जोशी यांच्या रसाळ, ओघवत्या आणि अमृतमय वाणीतून जणू मोक्षदायी अयोध्यानगरीच अवतरली होती. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे चरित्र ऐकताना सर्व श्रोते देहभान हरपून जात होते. बाल कांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड, युद्धकांड आणि उत्तरकांड अत्यंत बारकाव्यांसह ह.भ.प. माधव जोशी यांनी भाविकांपुढे प्रकट केले.
दररोज कथेनंतर आरती व प्रसादाची जबाबदारी सर्वांनी स्वयंस्फूर्तीने घेतली. सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कार्यक्रम एका वेगळ्याच उंचीवर गेला. या कार्यक्रमामुळे सर्वत्र मांगल्याचे पवित्र वातावरण होते. सर्व ज्येष्ठ नागरिक अत्यंत भक्तिभावाने एकत्र येऊन श्रीरामकथामृताचा आनंद घेत होते. सर्वांनी बुधवारी (ता. २५ ) श्रीरामनामाचा एक कोटी जप नामजप केल्याने सर्व वातावरण राममय होऊन गेले.


श्री खेडकर यांचे शिष्य यादवराव शिंदे आणि जिजाराम शिंदे यांनी संघास ध्वनी प्रणाली गुरुदक्षिणा म्हणून भेट दिली. या ध्वनी प्रणालीचे उदघाटन श्रीराम कथेने झाले, हा मोठा योगायोगच होता.

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सदस्य यांच्या काटेकोर नियोजनामुळे व परिश्रमामुळे कार्यक्रमाची उत्तमप्रकारे सांगता झाली. अभिजित कोरे यांनी सर्व भाविकांसाठी गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केले होते.

आनंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभासदांना अध्यात्मिक विषयांची अधिक आवड आहे, त्यामुळे उत्तम वैचारिक बैठक तयार झाली आहे. साहित्य, संगीत, कला यांच्या संगम अशा कार्यक्रमात दिसून येतो.


RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
few clouds
38.1 ° C
38.1 °
38.1 °
15 %
3.1kmh
20 %
Thu
40 °
Fri
40 °
Sat
42 °
Sun
41 °
Mon
40 °

Most Popular

Recent Comments