39.9 C
New Delhi
Thursday, June 11, 2026
Homeमहाराष्ट्रसीबीएसई परीक्षेत 'ध्रुव ग्लोबल स्कूल'ची गगनभरारी

सीबीएसई परीक्षेत ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’ची गगनभरारी

पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) २०२५-२६ च्या इयत्ता १० वीच्या परीक्षेत नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. शाळेच्या एकूण ६३ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ४१ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून निकालावर आपली मोहोर उमटवली आहे. स्कूलच्या ईशान्वी बारपांडा हिने ९९.२ टक्के गुणांसह उत्तुंग यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सीबीएसई दहावीच्या परीक्षेत यशाची परंपरा कायम राखली असून, यंदाच्या निकालात शाळेच्या गुणवत्तेचा झेंडा पुन्हा एकदा डौलाने फडकविला आहे. स्कूलच्या ईशान्वी बारपांडा हिने ९९.२ टक्के गुण मिळवून प्रथम, तर स्कूलच्या साईश केदार भुरके आणि युविका त्रिपाठी यांनी ९८.४ टक्के गुणांसह द्वितीय आणि आर्यन जगताप याने ९८ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.३० विद्यार्थ्यांची ‘शंभर नंबरी’ कामगिरी शाळेचा निकाल केवळ टक्केवारीपुरता मर्यादित नसून, ३० विद्यार्थ्यांनी विविध विषयांत १०० पैकी १०० गुण मिळवून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. यामध्ये प्रामुख्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए आय) मध्ये १० विद्यार्थी, इंग्रजी मध्ये ६,मार्केटिंग अँड सेल्स आणि जर्मन मध्ये प्रत्येकी ५, संस्कृत मध्ये ३, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र विषयात प्रत्येकी १ विद्यार्थी असे एकूण 30 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत.विद्यार्थ्यांच्या या देदीप्यमान यशाबद्दल ध्रुव ग्लोबल स्कूलचे विश्वस्त व संचालक यशवर्धन मालपाणी तसेच शाळेच्या प्राचार्या संगीता राऊतजी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. केवळ घवघवीत निकालच नव्हे, तर ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी संख्या आणि विविध विषयांत मिळवलेले पैकीच्या पैकी गुण, यामुळे ध्रुव ग्लोबल स्कूलने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.याबाबत संचालक यशवर्धन मालपाणी म्हणाले, आमच्या विद्यार्थ्यांनी सातत्य, शैक्षणिक काटेकोरपणा आणि केंद्रित मार्गदर्शनाचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांच्या मेहनती बरोबरच शिक्षक आणि पालकांच्या अखंड पाठिंब्याला आहे.तर प्राचार्या संगीता राऊतजी म्हणाल्या की दहावीच्या निकालात शाळेच्या ६३ पैकी ४१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह यश मिळवत यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत केली आहेत. ३० विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांत नोंदवलेला १०० गुणांचा विक्रम शाळेच्या सर्वसमावेशक शिक्षण पद्धतीची ग्वाही देत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
39.9 ° C
39.9 °
39.9 °
19 %
2.6kmh
0 %
Wed
40 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
41 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments